Saamana - How to decor Highclass Bedroom

11-09-2018 News

>>अमित आचरेकर, संचालक – वा कॉर्पोरेशन

कामावरुन थकून घरी आल्यावर आपली पावलं पहिल्यांदा वळतात ती बेडरूमच्या दिशेने. त्यामुळे बेडरूममध्ये शिरल्या शिरल्या सर्वात आधी आपल्याला प्रसन्न वाटायला हवं. याउलट जर तुम्हाला बेडरूममध्ये सतत उदासीनतेचंच वातावरण जाणवत असेल तर यावर नक्कीच काहीतरी तोडगा काढण्याची गरज आहे. खरंतर आपली बेडरुम आकर्षकरित्या सजवणं ही एक कला आहे. जी तुम्ही शिकून घेतलीत तर ती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

> सर्वात आधी तुम्हाला बेडरूमची स्वछता नियमितपणे राखणं आवश्यक आहे. त्यामुळे पसारा करणं शक्यतो टाळावं.

> बेडरूममध्ये जागा व्यापून टाकेल असं फारसं फर्निचर नसावं. वावरण्यासाठी थोडीफार जागा मोकळी असायला हवी.

> बेडरूममध्ये वातावरणनिर्मिती करण्यास प्रकाशयोजना सर्वात महत्वाची ठरते. त्यामुळे शक्यतो बेडरूममध्ये यलो किंवा डिम लाईटचा वापर करावा. जे डोळ्यांसाठी आरामदायी ठरु शकेल .

> साधारण रंगसंगतीचा अंदाज आपल्या प्रत्येकालाच असतो. त्यामुळे रूममधील बेड, फर्निचर , बेडशीट्सचे रंग भिंतींशी मिळताजुळते असतील, याची दक्षता बाळगावी.

> ऋतुनुसार बेडशीट्सचे कापड निवडा. ज्याची निगा राखणे तुम्हाला अधिक सोपे जाईल. उदाहरणार्थ : पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात तुम्ही कोटर्नच्या बेडशिट्स निवडा. तर थंडीच्या ऋतुत तुम्हाला उबदार बेडशीट्स जास्त सोयीस्कर ठरतील.

> आजकाल वेगवेगळ्या आकारांच्या उशा ऑनलाईन साईट्सवर सहज उपलब्ध आहेत. सध्या फळांच्या प्रिंटच्या उशांची चलती आहे. तसेच सणासुदीच्या दिवसात जर तुम्हाला बेडरुमला अगदीच पारंपरिक लूक द्यायचा असेल तर काठपदराच्या साडीच्या उशाही चांगला पर्याय ठरतील. त्याबरोबर शोभतील असे लोड्सदेखील तुम्ही वापरु शकता.

> आता हे सर्व झालं शोभेपुरतं. त्याबरोबरच आरोग्याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याकरिता सध्या अँटीबॅक्टेरियल उशा सर्वोत्तम ठरतील.

> एरवी प्रत्येक घरात वेगवेगळ्या फुलांच्या प्रिंट असलेल्या बेडशीट्स वापरल्या जातात. पण तुम्हाला जर तुमची बेडरुम इतरांपेक्षा वेगळी आणि जरा हटके हवी असेल तर त्यासाठीही वेगळ्या प्रिंटसाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.

या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही प्रत्यक्षात केलात, तर तुमची बेडरूमची हायक्लास वाटेल यात काही शंकाच नाही.